तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी निवड
अध्यक्षपदी सम्राट महाजन यांची निवड
तळोदा तालुका मराठी पत्रकार सघांची वार्षिक सभा येथील शासकीय विश्राम गृह येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल उर्फ कलीचरण सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यात सन 2025--26 ची नूतन कार्यकारणी ची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी सम्राट महाजन, उपाध्यक्षपदी दिपक मराठे, सचिव पदी सुशिल सूर्यवंशी
कोषाध्यक्ष पदी महेंद्र सूर्यवंशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच संघटने तर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी, भरत भामरे, ईश्वर मराठे, सुधाकर मराठे, किरण पाटील, डॉक्टर नारायण जाधव, हंसराज महाले, कैलास पाडवी, वैभव कर्णकार आदि सदस्य उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments