Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ग्राहक पंचायत महाराष्ट्र व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने तळोद्यात लाडक्या लालपरीचा वाढदिवस साजरा

 ग्राहक पंचायत महाराष्ट्र व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने तळोद्यात लाडक्या लालपरीचा वाढदिवस साजरा 

ग्राहक पंचायत महाराष्ट्र व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने तळोदा येथे लाडक्या लालपरीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


१ जुन १९४८साली अहमदनगर ते पुणे दोन बसेस एकाच वेळी धावल्या तेव्हा पासून ते आजपर्यंत (कोरोना चा पिरेड सोडून) अविरत धावत आहे ऊन,वारा, पाऊस, थंडीत देखील बस धावल्या.म्हणून बस ची यथोचित पुजा करून ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा नंदुरबार चे सचिव अशोक सुर्यवंशी यांनी लाल परी गुलाब पूष्प अर्पण करून बसच्या अडचणी त्यावर राज्य प्रवासी महासंघाने सोडवल्या यांवर मार्गदर्शन केले.


प्रवासी महासंघाचे अध्यक्ष जैन यांनी अक्कलकुवा आगाराला नवीन बसेस मिळाव्या मागणी केली. सचिव प्रा.आर.व्ही राणे प्रवाशांच्या सेवेसाठी प्रवासी महासंघ कोणते कार्यक्रम राबविण्यात येतात याचे मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा सचिव अशोक सुर्यवंशी, प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अॅड अल्पेश जैन, तालुका सचिव  प्रा.आर.व्हि.राणे, चेतन बैरागी, रसिलाबेन देसाई, अमीबेन तुरखिया, जिल्हा सदस्य राजेंद्र चौधरी, सहसचिव शरद सुर्यवंशी, कुशल जैन, चेतन धानका, दिपक लोहार, मनिष जैन, तळोदा बसस्थानकाच्या नियंत्रक वंदना गोसावी,शकील पिंजारी, अशोक पाटील चालक अशोक भिल, मनोज भारती, एस.एम.लांबोळे वाहक व प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले यावेळी प्रवाशींचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments