Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

'केळी रत्न 2025' पुरस्काराने सन्मानित शहाद्याच्या मुकुंद पाटील यांचा उल्लेखनीय सन्मान!



'केळी रत्न 2025' पुरस्काराने सन्मानित शहाद्याच्या मुकुंद पाटील यांचा उल्लेखनीय सन्मान!

शहादा तालुक्यातील होळमोहिदा येथील प्रगतशील शेतकरी मुकुंद सुभाष पाटील यांनी एकरी 30 टनांपेक्षा अधिक केळी उत्पादन घेण्याचा विक्रम प्रस्थापित करत, महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघ आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय केळी परिषदेमध्ये ‘केळी रत्न 2025’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम माढा (जि. सोलापूर) येथे पार पडला असून, राज्यभरातील शेतकरी, टिश्यू कल्चर कंपन्या आणि व्यापाऱ्यांचा मोठा सहभाग या परिषदेला लाभला.

मुख्य अतिथी म्हणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील, नारायण पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 नंदुरबार जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. मुकुंद पाटील यांचे अभिनंदन करताना जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 शेतकऱ्यांच्या मेहनतीला दिलेले हे राज्यस्तरीय यश नंदुरबार जिल्ह्यासाठी प्रेरणादायक आहे.

Post a Comment

0 Comments