अवैध एचटीबीटी कापूस बियाणाची गुजरात राज्य परिवहन द्वारे वाहतूक करणाऱ्यांचा डाव कृषी विभागाने लावला उधळून
नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा येथे कृषि विभागाची धडक कार्यवाही
सुमारे 1.5 लाख रकमेचा मुद्देमाल जप्त
गुजरात राज्य परिवहन द्वारे वाहतूक करणाऱ्यावर कृषी विभागाच्या पथकाने केली कार्यवाही.. याबाबतची अधिक माहिती म्हणजे गुजरात राज्यातून अवैध एचटीबीटी बियाणे हे गुजरात राज्यातीलच निझर येथे पुरवठा व तिथून इतरत्र याबाबतची विक्री केली जाते अशी गोपनीय माहिती कृषी विभागास मिळाली होती त्यानुसार कृषी विभागाने सदरच्या वाहनाची तपासणी करून हे कारवाई केली आहे.
आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग 5 वी कारवाई यामुळे अनाधिकृतरित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
महाराष्ट्र राज्य गुणनियंत्रण कृषि संचालक सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, कृषी जिल्हा अधीक्षक चेतन कुमार ठाकरे, कृषी विकास अधिकारी किशोर हडपे व तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक उल्हास ठाकूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दि. 6 रोजी मिळालेल्या गुप्त खबरीनुसार नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे प्रतिबंधित संशयित एचटीबीटी बोगस कापुस बियाणेची पाकीटे जप्त करण्यात आली आहेत.
कृषी विकास अधिकारी किशोर हडपे, अक्कलकुवा तालुका कृषी अधिकारी सुरज नामदास , स्वप्नील शेळके, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नंदुरबार,श्री. सचिन देवरे मोहीम अधिकारी, कृषी अधिकारी प्रकाश खरमाळे , कृषी अधिकारी पराडके यांच्या पथकाने सापळा लावून गुजरात राज्य परिवहन बस तपासणी करून प्रतिबंधित कापूस बियाणे हस्तगत केले आहे...
अक्कलकुवा तालुका पोलीस ठाण्यात प्रकाश खरमाळे यांनी फिर्याद दिली. कमलेश भाई व मनोहर भाई व उत्पादक कंपनी यांचे विरोधात अक्कलकुवा तालुका पोलीस स्टेशन मधे बियाणे कायदा १९६६, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ व जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईसाठी श्री चेतन कुमार ठाकरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नंदुरबार, श्री किशोर हडपे कृषि विकास अधिकारी नंदुरबार,श्री उल्हास ठाकूर तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग नाशिक व श्री कल्याण पाटील कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग नाशिक
यांनी मार्गदर्शन केले.
प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरोधात गय केली जाणार नाही असा कडक इशारा मा . सुभाष काटकर सर , विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी दिला आहे.... व जिल्ह्यातील शेतकरी यांनी परवानाधारक बियाणे कपंनीचे नोंदणीकृत कृषी सेवा केंद्रातूनच बियाणे खरेदी करावे असे आवाहन देखिल कृषी विभागाकडून करण्यात येत आहे...


Post a Comment
0 Comments