डॉ. मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार यांची NEET UG 2025 परीक्षा केंद्रांना भेट.
राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET UG 2025) पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दिनांक 03 मे 2025 रोजी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार यांनी नंदुरबार येथील विविध परीक्षा केंद्रांना भेट दिली.
या भेटीदरम्यान श्रीमती अंजली शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी, नंदुरबार तसेच संजय महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार हे उपस्थित होते.
यावेळी परीक्षार्थ्यांसाठी शांततामय, सुरक्षित व नियोजनबद्ध परीक्षेचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यात आली.
जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व सर्व संबंधित यंत्रणा परीक्षेच्या पारदर्शक व यशस्वी आयोजनासाठी सज्ज आहेत.
#NEETUG2025 #DistrictCollectorVisit #NandurbarAdministration #ExamPreparedness #PublicInformation #विद्यार्थीप्रेरणा





Post a Comment
0 Comments