मुसळधार पावसामुळे अनेक घरांची पडझड माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांची पाहाणी
नंदुरबार शहरातील बंधारहट्टी परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. काही घरांची पत्रे उडाले आहेत तर काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. झालेल्या नुकसानामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत संसार उपयोगी वस्तू नष्ट झाल्याने आदिवासी बांधवांना अनेक संकट समोर उभी झाले आहेत.
दिनांक १७ मे शनिवार रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली. घरांची पडझड झालेल्या आदिवासी बांधवांशी त्यांनी चर्चा केली. लवकरच संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करून भरपाई मिळवून देण्यासंदर्भात आश्वासन त्यांनी पीडित नागरिकांना दिले आहे. याच प्रसंगी घरकुलाचा लाभ घेण्याचा देखील त्यांनी आवाहन आदिवासी बांधवांना केले आहे. नागरिकांनी यावेळी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या.

Post a Comment
0 Comments