गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम.
तळोदा तालुक्यातील आमलाड येथील गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कूलचा इ दहावीचा शंभर टक्के निकाल असून यात एकूण 138 पैकी 138 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कु आदिती वसंत वसावे (86.40) प्रथम,कु स्वप्नील बटेसिंग वसावे (85.60) द्वितीय तर कु श्रुती संपत वसावे (85.40) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ विद्यादेवी तांबोळी, संस्थेचे मार्गदर्शक अशोकजी तांबोळी, ललित पाठक, प्राचार्य विश्वास पवार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेने आपली शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे.



Post a Comment
0 Comments