काठावर पास झालेल्या पठ्याने केक कापून केला आनंद साजरा व जल्लोष...
नुकताच दहावी चा ऑनलाईन निकाल जाहीर झाला त्यात कोणी पास झालं तर कोणी नापास झाला आहे. मात्र नंदूरबार जिल्ह्यात धडगाव शहरात राहणाऱ्या कार्तिक साठे हा तरुण एकदम काठावर पास झालं आहे.
कार्तिक ला 4 विषयात 35 गुण आहेत. तर उर्वरित इंग्रजी विषयात मध्ये 38 आणि सोशल सायन्स मध्ये 49 गुण मिळून हा पट्ट्या 38.40 टक्क्यांनी पास झाला आहे. काठावर पास झाला म्हणून कार्तिकच्या मित्रांनी पास झाल्याचा आनंदात केक कापून जल्लोष केला आहे. काठावर का होईना पण पास झालो ना हे म्हणत कार्तिकने केक कापत आनंद व्यक्त केला आहे....

Post a Comment
0 Comments