आध्यात्मिक योग गुरु श्री श्री रविशंकरजी यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात ४० जणांचे रक्तदान
——————————————
आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक व आध्यात्मिक गुरूदेव प.पू. श्री श्री रविशंकरजी यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी तळोदा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान श्रेष्ठ दान, रक्तदान जिवनदान, तसेच चला रक्तदान करुया, आपल्या रक्ताच्या थेंबाने, कुण्या एकाचे जिवन वाचवुया, ह्या उक्ती प्रमाणे या रक्तदान शिबिरात ४० दात्यांनी रक्तदान करत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जगाला जीवन जगण्याची कला शिकवणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते, आध्यात्मिक योगगुरू श्री श्री रविशंकरजी यांचा वाढदिवस सेवा, साधना आणि सत्संगासह विविध कार्यक्रमांनी दरवर्षी दिनांक 13 मे रोजी तळोदा शहरात साजरा करण्यात येतो. यानिमित्त संत सावता माळी भवन या ठिकाणी रविवार दिनांक 11 मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन आयोजन करण्यात आले. जग हे प्रगत झालेले असतानाही रक्ताला कुठलाही पर्याय शोधता आलेला नाही. माणसाला फक्त माणसाचेच रक्त लागते. जगामध्ये दर दोन ते तीन सेकंदाला कुणाला ना कुणालातरी रक्ताची गरज भासते. आजकाल धावपळीच्या काळात दिवसेंदिवस रक्ताची मागणी वाढते आहे. अपघात, छोट्यामोठ्या शस्त्रक्रिया, प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव, विविध आजार, तसेच थॅलेसिमिया सारखे रक्ताशी निगडीत इतर आजार, मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती, या कारणांमुळे रक्त व रक्तघटकाची मागणी वाढते आहे. याकरिता सर्वांनी वर्षातून दोन वेळा तरी रक्तदान करावे.
या रक्तदान शिबिरासाठी धुळे येथील डॉ.सुनील चौधरी व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन माळी समाज अध्यक्ष मा.श्री अनिल पुंडलिक माळी यांच्या हस्ते झाले. तसेच तळोदा येथील आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक /टिचर स्वप्निल राणे व सौ. सविता कलाल, तसेच सर्व स्वयंसेवक श्री.रविंद्र मगरे, अजित टवाळे, संतोष पवार, उदय सुर्यवंशी, मुकुंद वाघ, शिरीशकुमार सोनेरी, मनिष कलाल, जगदीश शिरसाठ, दिपक सूर्यवंशी, मुकेश कर्णकार, सौ नलीनी मगरे, सौ शितल सूर्यवंशी, सौ नितीका पवार, कल्पेश सुर्यवंशी, योगेश पवार, मुरलीधर मगरे, आदी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments