Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

१०० रुपयांचा स्टॅम्प पेपर २०० रुपयांला;व्हेंडरकडून नागरिकांची लुटमार*- बिरसा आर्मीची तहसीलदार व सहाय्यक निबंधकाकडे तक्रार

 *१०० रुपयांचा स्टॅम्प पेपर २०० रुपयांला;व्हेंडरकडून नागरिकांची लुटमार*- बिरसा आर्मीची तहसीलदार व सहाय्यक निबंधकाकडे तक्रार


(नमुना नं.८ साठी १०० रूपयांचा स्टॅम्प पेपर कशासाठी ?) 

तळोदा:

शासन आदेशान्वये शासन परिपत्रक क्रं.मुद्रांक २०१५/प्र.क्रं. १११ दि.१२ में २०१५, मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ आदेश ५८/२०२१ व महाराष्ट्र शासन राजपत्र क्रं.७२ दि. १४/१०/२०२४ नुसार जात प्रमाणपत्र,वास्तव्य प्रमाणपत्र,राष्ट्रीयत्वाचे  प्रमाणपत्र,नमुना नं.८,उत्पन्न प्रमाणपत्र व इतर सर्व शासकीय प्रकाराचा प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क माफ असतांना देखील नमुना नं.८ साठी काही ग्रामसेवकांकडून १०० रुपयांचा स्टॅम्प पेपरची सक्ती केल्याने व्हेंडर मनमानी करून १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर २०० रुपयाने देऊन लुटमार करत आहे.ही बाब बिरसा आर्मी पदाधिकाऱ्यांना लक्षात आल्याने संबंधित ग्रामसेविकाला नमुना नं. ८ साठी १०० स्टॅम्प पेपर कशासाठी असा जाब विचारला.ग्रामसेविकेने उडवाउडवीचे उत्तरे दिली.त्यानंतर संबंधित स्टॅम्प व्हेंडरचा येथे जाऊन १०० रुपयांचा स्टॅम्प पेपरचे २०० का घेतात? कोणत्या नियमानुसार असा जाब विचारला असता;त्यांनाही उडवाउडवीची उत्तरे दिली.बिरसा आर्मी पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार व सहाय्यक निबंधक यांना लक्षात आणून लेखी तक्रार दिली.निवेदनावर बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी, जिल्हा सचिव सतीश पाडवी, मोदलपाडा शाखाध्यक्ष रोहिदास वळवी,दिनेश ठाकरे,अजय वळवी, शामसिंग वळवी,नरपत ठाकरे,सुरेश वसावे,देविदास पाडवी,रोहिदास वळवी आदी.कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments