केळी संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसार केंद्रासाठी महत्वपूर्ण बैठक!
मंत्रालयात कृषिमंत्री मा.ना. माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादनावर संशोधन व तंत्रज्ञान प्रसार केंद्र स्थापनेसाठी महत्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीस प्रमुख आमदार रावेर अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
बैठकीत केळी संशोधन व तंत्रज्ञान प्रसार केंद्र स्थापन करून संशोधनातील नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे. ‘डिजिटल शेती शाळा’ उपक्रम प्रभावीपणे राबवणे, संशोधनातील माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी. केळीवरील विविध रोग, कीड नियंत्रण आणि पिक व्यवस्थापनावर वैज्ञानिक मार्गदर्शन उपलब्ध करणे. विषयांवर चर्चा केली.
रावेर-यावल विधानसभा क्षेत्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने वेळीच मार्गदर्शन मिळेल, तसेच पिकांचे उत्पादन व दर्जा वाढवता येईल.
बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव मा. विकास चंद्र रस्तोगी, फलोत्पादन संचालक डॉ. के.पी. मोते, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, तसेच केळी संशोधन केंद्राचे उद्यानवेत्ता डॉ. अरुण भोसले उपस्थित होते.
#कृषीविकास #केळीसंशोधन #शेतकरीकल्याण #तंत्रज्ञानप्रसार #जळगाव #रावेर #यावल 🚜💚



Post a Comment
0 Comments