Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भाग्यश्री विसपुते यांनी स्वीकारला धुळे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

 भाग्यश्री विसपुते यांनी स्वीकारला धुळे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

  धुळे, दिनांक 27 मे, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : धुळेच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेल्या श्रीमती भाग्यश्री विसपुते यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आज स्वीकारला.


  जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांनी आज दुपारी धुळे जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.



  याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी (धुळे) रोहन कुवर, भूसंपादन अधिकारी सीमा अहिरे, बालाजी क्षिरसागर, चंद्रशेखर देशमुख, संजय बागडे, तहसलिदार (धुळे) अरुण शेवाळे, पंकज पवार, प्रवीण चव्हाणके, अपर तहसिलदार वैशाली हिंगे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


  यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी औपचारिक ओळख करुन संवाद साधला.


Post a Comment

0 Comments