शेतमजूर युनियनचे तरुण कार्यकर्त्यांचे जिल्हा अभ्यास शिबिर संपन्न
तळोदा : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा नंदुरबार जिल्हा कमिटी च्या वतीने तरुण कार्यकर्त्यांचे अभ्यास शिबिर १८ व १९ मे रोजी तळोदा तालुक्यातील धनपूर येथे संपन्न झाले.
१८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता सर्व सहभागींची ओळख करून देण्यात आली. पारंपरिक आणि जनआंदोलनाशी संबंधित गाण्यांनी कार्यक्रमाला ऊर्जा दिली.
१९ मे रोजी सकाळी कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहिल्या सत्रात श्रमिक चळवळीचे नेते रवींद्र मोकाशी (सोलापूर) यांनी "श्रमिक संघटनेचे योगदान" यावर सविस्तर भाष्य केले. त्यांनी संघटित श्रम शक्तीचे ऐतिहासिक संदर्भ आणि आजची गरज अधोरेखित केली.
दुसऱ्या सत्रात लेखक विचारवंत दत्ता देसाई (पुणे) यांनी "समाज बदल आणि श्रमिक – पूर्वी आणि आत्ता" या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्यांनी सामाजिक परिवर्तनातील श्रमिक वर्गाची भूमिका अधोरेखित केली.
त्यानंतर प्रा. नानासाहेब गव्हाणे (सोलापूर) यांनी "भारतीय संविधानाने आपल्याला काय दिले?" या विषयावर संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि सामाजिक न्यायाच्या संकल्पनेची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात शेतमजूर युनियन चे राज्य सचिव काॅ. बळीराम भुंबे यांनी "शेतमजूर संघटनेचे महत्त्व आणि दिशा" यावर मांडणी केली.
जिल्हाभरातून 45 निवडक युवक युवती शिबिरात सहभागी झाले होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी धनपूर गावकऱ्यांसह कॉ शामसिंग, अनिल, सुदाम, सुनील, नाथूभाऊ, रुबाबसिंग यांनी मेहनत घेतली.







Post a Comment
0 Comments