Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी वस्तूचे वाटप — योगेश मराठे यांच्या पुढाकाराने स्तुत्य उपक्रम

 आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी वस्तूचे वाटप — योगेश मराठे यांच्या पुढाकाराने स्तुत्य उपक्रम

तळोदा : शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी वस्तूंचे वाटप करून खर्चाला फाटा दिला जात सामाजिक भान जपणारा उपक्रम तळोद्यात राबवण्यात आला. या उपक्रमात चर्मकार समाज व मातंग समाज यांना प्रत्येकी दहा खुर्च्या व दोन मॅट, तर कुकरमुंडा येथील इस्कॉन मंदिराला गाद्या व मॅट प्रदान करण्यात आल्या.

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कोणताही मोठा खर्च न करता, समाजासाठी उपयोगी ठरणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते योगेश मराठे हे समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून नेहमी गोरगरीब जनतेसाठी विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन एक मदतीचा हात देत असतात याच भावनेतून त्यांनी एक नियोजन व पुढाकार घेतला. त्यांनी वाढदिवसानिमित्त औपचारिकते ऐवजी सामाजिक उपयुक्ततेला प्राधान्य दिले, हे विशेष उल्लेखनीय आहे.


          कार्यक्रमावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. विलास डामरे, विधानसभा निवडणूक प्रमुख कैलास चौधरी, भगवान मगरे, हेमलाल मगरे माजी नगरसेवक, कलीम अन्सारी, कल्लू अन्सारी, अंबालाल साठे, श्रावण तिजवीज, प्रदीप शेंडे, दिपक चौधरी, शैलेंद्र अहिरे, लक्ष्मण माळी, संदीप साळी, रामलाल परदेशी, अनिल परदेशी, प्रविण चौधरी ,दिलीप चौधरी, श्रावण तिजवीज, शैलेंद्र अहिरे व जीवन अहिरे आदीसह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments