Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोदा समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना मिळाले इको फ्रेंडली वॉटर फिल्टर यंत्राचे पेटंट

 तळोदा समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना मिळाले इको फ्रेंडली वॉटर फिल्टर यंत्राचे पेटंट 

तळोदा : आरोग्यवर्धक नैसर्गिक साहित्याचा वापर करून निर्मित केलेले इको फ्रेंडली वॉटर फिल्टर यंत्र प्रतिकृतीचे भारतीय पातळीवरील पेटंट घेण्यामध्ये तळोदा येथिल समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना यश आले. आदिवासीबहुल भागातील प्राध्यापकांच्या यशाचे कौतुक करण्यात येत आहे.

          पारंपारिक वॉटर प्युरिफायरमुळे आरोग्यावर  प्रतिकूल परिणाम देखिल होत होतात.यावर महत्त्वपूर्ण उपाय म्हणून तळोदा समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.निलेश गायकवाड,प्रा.डॉ.प्रमोद जाधव आणि प्रा.नितीन तायडे यांच्यासह तसेच नाशिक येथील मराठा विद्याप्रसारक समाज संचलित समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.डॉ. घनश्याम जगताप आणि प्रा. संदेश बल्लाळ यांनी इको फ्रेंडली वॉटर फिल्टर प्रतिकृतीच्या माध्यमातून शोधून काढला आहे. 

   या पेटंटमुळे समाजकार्य अभ्यासक्रमाला विशेष व्यापकता मिळाली आहे.शुद्ध जल यंत्राला एक नवी दशा व दिशा प्राप्त झाली आहे.

            या प्रकारचे यंत्राची प्रतिकृती अर्थात घरगुती वापरासाठी अत्यंत स्वस्त व माफक दरात कामगार स्त्रिया,गरीब,वंचित,आदिवासी ग्रामीण या लोकांसाठी या यंत्राचा वापर करून घरगुती स्तरावर पाण्याची शुद्धता वाढवता येणार आहे. सध्याच्या काळात निर्माण होणारी पाणीटंचाई व शुद्ध पाण्याचा प्रश्न ह्या यंत्राच्या माध्यमातून सोडविला जाऊ शकतो असा विचार समाजकार्याच्या वरील प्राध्यापकांनी करून या पद्धतीचे यंत्राची प्रतिकृती तयार करून त्याचे भारतीय स्तरावरील पेटंट घेतलेले आहे. ही सामाजिक आरोग्यविषयक नैतिकता समाजकार्याच्या प्राध्यापकांनी दाखवली असून ग्रामीण आदिवासी भागात याचा वापर केला जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील लोकांना माफक दरात हे उपलब्ध होऊ शकते.

    यापूर्वी देखिल प्रा.डॉ.निलेश निलेश गायकवाड यांनी बंद खोली किंवा नियंत्रित वातावरणातील हवा प्रदूषणाची पातळी ओळखणारे यंत्राचे प्रतिकृती चे भारतीय पातळीवरील पेटंट घेण्यामध्ये यश मिळवले आहे.


Post a Comment

0 Comments