तळोदा तालुका सरपंच युनियनच्या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर..
तालुका अध्यक्षपदी तळव्याचे सरपंच मोग्या पाडवी, दलेलपुरचे सरपंच उपाध्यक्षपदी राजू प्रदान
तळोदा : येथील मारुती मंदिररात तळोदा तालुका सरपंच युनियनची सा बैठक पार पडली. बैठकीस तालुक्यातील विविध गावांतील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी युनियनच्या पुढील कार्यकालासाठी नवीन कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली.
तालुकाध्यक्ष मोग्या पाडवी
या नव्या कार्यकारिणीत तळवे ग्रामपंचायतीचे तालुका अध्यक्ष म्हणून तळवे चे सरपंच मोग्या पाडवी यांची निवड करण्यात आली. तर दलेलपूरचे सरपंच राजू प्रधान यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
उपाध्यक्ष राजू प्रधाननवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. आगामी काळात युनियनच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वासही नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी व्यक्त करण्यात आला.



Post a Comment
0 Comments