तळोदा शहर दोडे समाजाच्या वतीने वृक्षारोपण
तळोदा शहर दोडे गुजर समाज आयोजित बॉक्स क्रिकेट चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्याचा निषेध क्रिकेटप्रेमी व समस्त दोडे गुजर समाज बांधवांकडून करण्यात आला व मृत पावलेल्या सर्व भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
काही दिवसापूर्वी मृत क्रिकेटप्रेमी कै.विवेकभाई चौधरी यांचे निधन झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ तळोदा शहर दोडे गुजर समाज वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमास कृष्णदास पटेल , प्रकाश पटेल, प्रशांत चौधरी, प्रकाश पाटील, परेश पाटील, सुभाष पाटील, राजेश पाटील, भीमसिंग पाटील, योगेश पाटील, तळवा सागर पाटील, केदार चव्हाण, दत्तू पाटील, अरविंद पटेल, विनल पटेल व मुकेश पाटील, गोविंद पाटील, सोमनाथ पाटील व तळोदा दोडे गुजर समाज आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विनोद चव्हाण, हितेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, राहूल पाटील, सनील पाटील, नंदू पाटील, गणेश पाटील, प्रदीप पाटील, नयन पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांतीलाल पाटिल यांनी केले.




Post a Comment
0 Comments