गौरव कनिष्ठ महाविद्यालयाचे इयत्ता बारावी परीक्षेत घवघवीत यश.
तळोदा तालुक्यातील आमलाड येथील गौरव कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा इ बारावीचा 88.67% निकाल लागला असून
यात वाणिज्य शाखेतून कु.वेदांत किरणसिंग राजपूत प्रथम तर विज्ञान शाखेतून कु.मोहित योगेश सुशिर प्रथम,कु.पूजा दशरथ वळवी द्वितीय तर कु प्रगती योगेश पाटील तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ विद्यादेवी तांबोळी,संस्थेचे मार्गदर्शक श्री अशोक तांबोळी,महाविद्यालयाचे मार्गदर्शक श्री ललित पाठक, प्राचार्य श्री विश्वास पवार यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




Post a Comment
0 Comments