Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

छत्रपती संभाजी महाराज जयंती तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ

 छत्रपती संभाजी महाराज जयंती तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ 

       तळोदा, ता. १४ छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, त्याग, बलिदान, कर्तुत्व अफाट होते. गुणवान विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भविष्यात असेच उज्वल यश संपादन करून यशाच्या शिखरावर पोहोचावे. आणि आपल्या आईवडिलांचे व शाळेचे नाव रोशन करावे असे प्रतिपादन प्राचार्य अमरदीप महाजन यांनी केले.

अध्यापक शिक्षण मंडळ धुळे संचलित येथील स्वातंत्र्यसेनानी, प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कूल व श्री शि. ल. माळी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आज बुधवारी (ता. १४) छत्रपती संभाजी महाराज जयंती तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य अमरदीप महाजन अध्यक्षस्थानी होते. प्राचार्या शितल महाजन, पर्यवेक्षक अंबरीश सूर्यवंशी, कला विभाग प्रमुख संदीप मगरे, वरिष्ठ लिपिक हर्षल महाजन तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी कै. प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन (बाबाजी) यांच्या पूर्णकृती पुतळ्यास व संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन व अभिवादन केले. विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केलेल्या व यशाची परंपरा कायम राखणाऱ्या प्रथम पाच क्रमांक मिळवणारे गुणवान विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुणवान विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आपले यशस्वीतेचे अनुभव मांडले. याप्रसंगी पी. व्ही. सोनवणे तसेच उपस्थित पालक श्री. पाडवी, श्रीमती मोहने, श्री. वसावे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


क्रीडा विभाग प्रमुख सुनील सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. सुशील पाडवी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments