कूंडवे गावाला गावठाण जागा सह रस्ता सुविधा मिळाव्यात ग्रामस्थांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
तळोदा तालुक्यातील इच्छागव्हाण ग्राम पंचायत अंतर्गत असलेल्या कुंडवे गावाच्या नागरीकांनी गांवठाणची जागा मिळावी यासह रस्त्या व इतर सुविधा मिळाव्यात अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनात केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी नाय माळ पाड्याला भेट दिली. त्यावेळी कुंडवे ग्रामस्थांनी निवेदन सादर केले.
जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, प्रांतअधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावांदर तळोदा तहसीलदार दिपक धिवरे , गट विकास अधिकारी राजू किरवे, मेवासी वन विभागाचे उपवन संरक्षक लक्ष्मण पाटील हे अधिकारी विभाग प्रमुख उपस्थित होते.
ग्रामपंचायत इच्छागव्हाण ता.तळोदा अंतर्गत डोंगर, दऱ्यात वसलेला नयामाळ गावाचा जागा पहाणी साठी आलेले महसूल विभागाचे आणि वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आलेले असताना
आदिवासी विकास विभागाचा बांधकाम सुरु असलेल्या शासकीय आश्रम शाळेचा प्रशासकीय इमारत परिसरात तळोदा तालुक्यातील मौजे- कुंडवे गावाच्यानागरीकांनी गांवठाण ची जागा मिळावी यासाठी नागरीकानी जिल्हाधिकारी यांना पत्र देवून मागणी केली.
मौजे कुंडवे ता. तळोदा जि. नंदुरबार येथील समस्त गावकरी
उपरोक्त विषयान्वये आम्ही समस्त कुंडवे गावचे गावकरी आपणास विनंतीपूर्वक अर्ज सादर करीत आहोत कि, आमचे कुंडवे गाव ग्रुप ग्रा.पं. इच्छागव्हाण अंतर्गत तळोदा तालुक्यातील 19 व्या शतकातील जुने महसूली गाव असून गावाची लोकसंख्या लगभग 250-300 इतकी असून आम्हाला गांवठाण ची जागा नसून रेव्हनी शेतात गाव वस्ती आहे. कुंडवे गावचे लगभग 120-130 इतके कुटुंब असून कुंडवे गावात राहण्यासाठी गांवठाण ची जागा उपलब्ध नसल्यामुळे मुळ वतन कुंडवे गावाचे असलेले जवळपास 70-75 कुटुंब हे इच्छागव्हाण गावात राहायला गेलेले आहेत तर काहीं लोकांनी शेतात घरे बांधले आहेत. गांवठाण नसल्यामुळे गावात ये-जा कारणेस, वाहतुक-दळणवळण साठी पक्के रस्ते होत नाहीत. शेतातून, पावसाळ्यात चिखलात, वन विभागातून कच्च्या रस्त्याने वाहतुक दळणवळण/प्रवास करावा लागतो.
गांवठाण नसल्यामुळे रस्ते, पाण्याची सुविधा करणे, शासनाचे विविध इमारत बांधकामे उदा. शाळा, अंगणवाडी, दवाखाना, रास्त दुकान यांचे बांधकामे करता येत नाही, घरकुलांचे बांधकाम कारणेस अडचण येत आहे, इतर पायाभूत योजना, सेवा सुविधा मिळणेस समस्या होत आहे. आम्हाला गावठाणसाठी जागा मिळतील तर सर्व सेवा सुविधा स्थानिक ठिकाणी गावातच मिळतील.
तरी महोदया आपणास विनंती आहे कि, आम्हा गावकऱ्यांच्या समस्त समस्यांचा विवेक पूर्ण विचार करुन आमच्या कुंडवे गावासाठी आमच्या मुला-बाळांसाठी त्यांच्या उज्वल भविष्यासाठी वनविभागाच्या कुप नं. 402 रेस्ट हाऊस च्या परिसरात गांवठाण ची जागा उपलब्ध करुन द्यावी व सर्व मुलभूत सेवा सुविधा उपलब्ध होणेसाठी आपल्या स्तरावरील योग्य ती कार्यवाही करण्यात यावी ही विनंती अर्ज जिल्हाधिकारी यांना पत्र देवून केली आहे
मागणी अर्जा वर नागेश देविसिंग नाईक, चिंतामण शिवा नाईक, राकेश देविसिंग नाईक, देविसिंग लोसा नाईक, वर्षा राकेश नाईक, कमित्रा नाईक, बावीबाई नाईक, उत्तम नाईक, किंकन नाईक, रोहिदास नाईक, यशवंत नाईक, किसन नाईक, श्रावण नाईक, कृष्णा नाईक,उंबर्या नाईक, करमसिंग नाईक, विजेसिंग प्रधान, केमू नाईक, वळवी, तुषार वळवी, दीपक वळवी व इतर गावातील गावकरी महिला-पुरुष, यांनी सह्या केल्या आहेत.


Post a Comment
0 Comments