तळोदा महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
तळोदा - करिअरच्या दृष्टीने इयत्ता बारावीचे वर्ष हे फार महत्वाचे असते. येथुनच पुढे कला, वाणिज्य व विज्ञान यासह विविध शाखांमधुन शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध होत असतात. त्यासाठी योग्य दिशा आणि मार्गदर्शनाची गरज असते. म्हणुन इयत्ता बारावीची परीक्षा दिलेल्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
प्राचार्य डाॅ.हेमंत दलाल यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत कार्यशाळा पार पडली. यावेळी प्रा.डाॅ.सुनिल गोसावी, प्रा.डाॅ.राजेन्द्र मोरे, प्रा.डाॅ.गौतम मोरे, प्रा.डाॅ.हेमंत सावंत, प्रा.डाॅ.संजयकुमार शर्मा, प्रा.ललित पाटील यांनी मार्गदर्शन केले. सर्व वक्त्यांनी कला (मानविकी), वाणिज्य व विज्ञान या विद्याशाखांचे महत्व पटवुन देत यात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि नोकरीविषयक उपलब्ध संधींबाबत मार्गदर्शन केले. तसेच या विद्याशाखांमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन केले. प्राचार्य डाॅ.हेमंत दलाल यांनी अध्यक्षीय समारोप करतांना विद्यार्थ्यांना अनेक प्रेरणादायी विचार दिले.
सूत्रसंचालन प्रा.डाॅ.एम.एस.जावरे यांनी केले. संयोजन प्रा.डाॅ.संजयकुमार शर्मा, प्रा.डाॅ.जावरे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांसह प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments