भारतीय जैन संघटनेतर्फे प्रकाशा वृद्धाश्रमात मातृत्व दिन साजरा, मातांना मिळाला काठीच्या आधार...
तळोदा –:
"स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी"असे म्हटले जाते मातृप्रेमाच्या महिमा जगात मातेच्या प्रेमाची कुठल्याही गोष्टीची तुलना होऊ शकत नाही मातृत्व दिनाचे उचित्य साधून तळोदा शहरातील सेवाभावी सामाजिक संस्था भारतीय जैन संघटना ,सहयोग सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिणकाशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा येथील वृद्धाश्रमात वृद्ध माता ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान करून त्यांना वृद्धाश्रमाचे अध्यक्ष मोहन भाई चौधरी तळोद्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे भारतीय जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲड अल्पेश जैन यांच्या हस्ते काठ्या व वेदना शामक औषधी मलम चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी चेतन शर्मा कुशल जैन हेमंत वाणी चेतन धनका रमेश कुमार भाट यांचे सह भारतीय जैन संघटना चे अध्यक्ष ॲड अल्पेश जैन सोशल ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी मातृत्व दिनानिमित्त वृद्धाश्रमाचे अध्यक्ष मोहन भाई चौधरी पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट अल्पेश जैन वृद्धाश्रमातील वृद्धांना स्वतः मीष्ठाण भोजन वाटले त्यांच्यासोबत भोजन घेऊन थंडगार ताक त्यांना वाटप केला त्यांच्यासोबत भोजन घेतले त्यांना काय हवे नको त्यांची विचारपूस करून त्यांच्याशी स्नेहाने संवाद साधला सामाजिक सेवाभावी कार्यकर्ते त्यांचे प्रेम त्यांनी दाखविलेली माणुसकी वृद्धाश्रमातील वृद्ध माता ज्येष्ठ नागरिक यांच्या विषयी मायेच्या ओलावा बघून वृद्धाश्रमातील वृद्धांचे अंतकरण हेलावले त्यांचे डोळे भरून आले.
या सामाजिक कार्यकर्त्यांनी जो मायेच्या ओलावा त्यांनी दाखविला ते दाखविण्यासाठी त्यांचे ऋण कसे व्यक्त करावे हे त्यांना कळेना हा आगळावेगळा अनोखा कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट अल्पेश जैन तळोदा सचिव कुशल जैन चेतन शर्मा चेतन धानका नितीन पाटील रमेश कुमार भाट यांच्यासह भारतीय जैन संघटना सहयोग सोशल ग्रुप वृद्धाश्रमाचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले



Post a Comment
0 Comments