Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोदा नगरपरिषदेच्या मालकीच्या शॉपिंग गाळ्यांचा पारदर्शी लिलाव पार पडला

 तळोदा नगरपरिषदेच्या मालकीच्या शॉपिंग गाळ्यांचा पारदर्शी लिलाव पार पडला

                 तळोदा नगरपरिषदेच्या मालकीच्या शॉपिंग गाळ्यांचा पारदर्शक पद्धतीने लिलाव आज दिनांक 19 मे 2025 रोजी नगरपरिषद कार्यालयात यशस्वीरीत्या पार पडला. या लिलाव प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार नगरपरिषद मुख्याधिकारी, राहुल वाघ, हे होते.

या लिलावाचा उद्देश नगरपरिषद हद्दीतील गाळे पारदर्शी व नियमानुसार इच्छुकांना देणे हा होता. लिलाव प्रक्रिया ही अत्यंत खुल्या व पारदर्शी पद्धतीने पार पडली.

लिलावाचा 1. सर्वे नं. 2 व 3, आरक्षण क्र. 6, शॉपिंग कॉम्प्लेक्स, तळमजला (जुन्या शॉपिंगजवळील जागा): एकूण 9 गाळ्यांपैकी सर्व गाळ्यांचा लिलाव यशस्वी झाला. 2. सर्वे नं. 2 व 3-ब, आरक्षण क्र. 6, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पहिला मजला: एकूण 59 गाळ्यांपैकी 3 गाळ्यांचा लिलाव यशस्वी झाला. 3. सर्वे नं. 25/2, तळमजला, रस्त्यालगतची दुकाने: एकूण 4 पैकी सर्व 4 दुकानांचा लिलाव यशस्वी झाला. 4. सर्वे नं. 25/2, पहिला मजला, हॉल: या हॉलसाठी कोणतीही मागणी न आल्यामुळे तो अद्याप लिलाव प्रक्रियेत अपूर्ण आहे.

                या यशस्वी लिलाव प्रक्रियेमुळे तळोदा नगरपरिषदेच्या महसूलात वाढ होणार असून, ही प्रक्रिया भविष्यातही अशाच पारदर्शकतेने राबविण्यात येईल, असे मुख्याधिकारी यांनी सांगितले.       प्रसंगी मुख्य अधिकारी विक्रम जगदाळे प्रशासकीय अधिकारी कमलेश काळे कर निरीक्षक दीपक पाटील लेखापाल लखन कंडरे नगररचनाकार सनी ठाकरे स्वच्छता निरीक्षक किशोर मोरे, संगणक अभियंता सुशीलकुमार बोधडे, अश्विन परदेशी, राजेंद्र माळी, दिगंबर माळी, नारायण चौधरी, नितीन शिरसाट, अजय वाघ, बटू नगराळे, जगदीश सागर इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments