तळोदा नॅशनल हायस्कूल येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
तळोदा येथील नॅशनल हायस्कूलमध्ये आज दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात नॅशनल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आदरणीय इकबाल शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर इकबाल शेख यांनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारसावर आणि राज्याच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. तसेच, विद्यार्थ्यांनी राज्याच्या विकासात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.
नॅशनल हायस्कूलचे विद्यमान मुख्याध्यापक एजाज कुरेशी यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विशद केले. त्यांनी सांगितले की, हा दिवस महाराष्ट्राच्या निर्मितीचा आणि मराठी अस्मितेचा गौरव करण्याचा दिवस आहे.
याप्रसंगी शाळेतील शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला जुबेर अन्सारी, मन्सूरी शब्बीर, नाजनीन पठाण, इरफान शेख, इम्रान सय्यद, खालीद सय्यद, शरीफा कुरेशी, शेख मोहसीन, तौसिफ़ मन्यार, अमीन खान, हमीद शेख आणि जुबेर लशकरी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अन्सारी जुबेर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शब्बीर मन्सूरी यांनी केले. एकंदरीत नॅशनल हायस्कूलमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला.

Post a Comment
0 Comments