पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्त तळोदा तालुका भाजपा च्यावतीने विविध कार्यक्रम संपन्न
तळोदा :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त तालुका भारतीय जनता पार्टी च्यावतीने इच्छागव्हाण ( कुंडलेश्वर मंदिर) येथे आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमात श्री कुंडलेश्वर महादेव मंदिर परिसरात साफ सफाई करण्यात आली. अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी 11 वर्षात पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू केलेल्या योजनाची माहिती दिली.
कार्यक्रम भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी व भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी आणि शहादा तळोदा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
प्रसंगी जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी, भाजपा तालुका अध्यक्ष दरबारसिंग पाडवी, विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, आय टी सेल जिल्हा अध्यक्ष दारासिंग वसावे, आदिवासी मोर्चा तालुकाध्यक्ष कैलास वसावे, बूथ अध्यक्ष लालसिंग पाडवी, विलास पाडवी, अर्जुन प्रधान, सखाराम पाडवी, विलास तडवी, देवराम पाडवी, संदीप पाडवी, अमृत वळवी, कृष्णा पाडवी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments