तळोदा तालुका परिसरात वारावादळा जोरदार पावसाने पिकांचे मोठे नुकसान
तळोदा तालुक्यातील रांझणी,रोझवा, जीवननगर पुनर्वसन सह परिसरात दि.12 मे रोजी सायंकाळी पाच वाजता वेगवान वारे, विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा बाजरी,भुईमूग, टरबूज,मका,पपई ही पिके तसेच आंबा बागांना पावसाचा मोठा फटका बसला असून गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळीमुळे आधीच नुकसान झाले असताना जोरदार पाऊस बरसल्याने ह्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरीची चिंता वाढली असून तात्काळ पंचनामे करण्यात येऊन नुकसानभरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
परिसरात बाजरी कापणी, मळणी, भुईमूग काढणी,मका काढणे सुरू आहे. जोरदार पावसाने हजेरी लावल्याने आताही पिकांचे मोठे नुकसान झाले असून गुरांसाठी बाजरी, भुईमूगच्या चाराही खराब झाला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात आंबा बागांमध्येही आंबा तोडणी, पिकवणे,जागेवरच विक्री सुरू असून या आलेल्या पावसामुळे आंबा बागांचे मोठे नुकसान झाले असून वेगवान वाऱ्यामुळे कच्च्या कैऱ्या मोठ्या प्रमाणावर उन्मळून पडल्या असून आंबा उत्पादक शेतकरी, व्यापारी यांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणावर घरकुलांची कामे सुरू असून अचानक आलेल्या वारावादळ, पावसामुळे बांधकाम साहित्यांचेही मोठे नुकसान झाले असून लाभार्थ्यांची विटा, रेतीसारखे बांधकाम मटेरियल शोधाशोध करून अव्वाच्या सव्वा दरात आणण्यात येऊन आपले घरकुलाचे काम मार्गी लावत असतांना अवकाळीमुळे सिमेंट, रेती यांचे नुकसान झाले असून त्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.



Post a Comment
0 Comments