Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

चक्रीवादळामुळे मवान गावात मोठे नुकसान; सामाजिक कार्यकर्ते किरसिंग वसावे यांनी तात्काळ मदतीची मागणी केली

 चक्रीवादळामुळे मवान गावात मोठे नुकसान; सामाजिक कार्यकर्ते किरसिंग वसावे यांनी तात्काळ मदतीची मागणी

अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मवान गावात अलीकडील चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपत्तीच्या घटनेत मगन पोहल्या वसावे यांच्या घरावर एक मोठे झाड कोसळले असून, त्यामुळे त्यांच्या घराला गंभीर हानी पोहोचली आहे. या झाडाच्या कोसळण्यामुळे घराचा छप्पर फोडले गेले असून, घरात अनेक आर्थिक वस्तू देखील नुकसानग्रस्त झाल्या आहेत.

घटनेनंतर तलाठी केशव तडवी यांनी तात्काळ पंचनामा करुन घटनास्थळी नुकसानाची नोंद घेतली आहे. पंचनाम्यामध्ये घराचे किती नुकसान झाले आहे, याचा तपशीलवार उल्लेख करण्यात आला असुनन, नुकसान भरपाईसाठी आवश्यक त्या कारवाईसाठी प्रशासनाला सूचना देण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते किरसिंग वसावे यांनी या घटनेवर त्वरित लक्ष देत पीडित कुटुंबाला तात्काळ मदत देण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, “चक्रीवादळामुळे झालेल्या या अनपेक्षित आणि मोठ्या नुकसानीमुळे मगन पोहल्या वसावे यांच्या कुटुंबाला आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन नुकसान भरपाई दिली पाहिजे, जेणेकरून पीडितांना त्यांच्या दैनंदिन जीवनात लवकरच सावरण्याची संधी मिळू शकेल.”


किरसिंग वसावे यांनी स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत तसेच संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत त्वरित मदतीसाठी आवाहन केले असून, योग्य ती मदत व भरपाई देण्यास हातभार लावण्याची मागणी केली आहे.


स्थानिक प्रशासनाकडूनही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून लवकरच मदत पुरवण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पीडित कुटुंबाला या संकटातून लवकर बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने आणि सामाजिक संस्था एकत्र येऊन मदतीचा हात पुढे करावा, अशी आशा आहे.

Post a Comment

0 Comments