अक्कलकुवा पंचायत समितीत आमदार आमश्या पाडवी यांनी घेतली ग्रामपंचायत प्रशासन व बचत गटाची आढावा बैठक
यावेळी बोलताना आमदार आमश्या दादा पाडवी यांनी महिला बचत गटाविषयी बोलतांना सांगितले की आपल्या भागातील प्रत्येक महिला सक्षम व्हावे या उद्देशाने राज्य शासनाने महिलांना प्रशिक्षण देऊन आर्थिक स्थिती सुधारली जावी तसेच आपल्या भागातील स्थलांतर थांबवून उन्नत समाज घडविण्यासाठी महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे.
या आधी महिला बचत गटांना शासनाकडून तीस हजार रुपये 15 हजार रुपये देण्यात येत होते आता मात्र त्या प्रत्येक गटातला 30000 रुपये अनुदान देण्यात येते आणि आज अक्कलकुवा तालुक्यात 3300 महिला बचत गट स्थापन झाले आहेत.
तसेच भारत स्वच्छ मिशन अंतर्गत आपले गाव व आरोग्य अबाधित राहावे यासाठी गावातील घनकचरा एका ठिकाणी गोळा करून त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करुन आपल्या शेतीच्या माध्यमातून आपणास सकस आहार मिळेल यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायत गावात घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने घनकचरा व्यवस्थापन उभारण्यात आलेले आहेत. या शेडमध्येच आपल्या गावातील घनकचरा एकत्र करून गावात स्वच्छता ठेवावी यावेळी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी महान क्रांतिकारक यांच्या प्रतिमा लावाव्यात यांसाठी स्वतः गोसा पेंटर यांनी पेंटिंग केलेल्या प्रतिमेचे विमोचन करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लालु पावरा, सरपंच उषाताई बोहरा, पाणी पुरवठा विभागाचे तुषार वाघ, बांधकाम विभागाचे उप अभियंता जे.पी.ठाकरे, पंचायत समिती विस्तार अधिकारी वाय डि पवार आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी दोन्ही विभागाचा आढावा घेऊन कामाची स्थिती जाणून घेतली.यावेळी अहवाल लेखन आमदार आमश्या पाडवी यांचे स्विय सहाय्यक रविंद्र गुरव यांनी केले तसेच कार्यक्रमात सोशल मीडिया प्रमुख हुजेफा भाई बलोच सह सरपंच, पंचायत समितीचे कर्मचारी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments