रोहिणी ग्रामपंचायत देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार
केंद्र शासनामार्फत आयोजित राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स २०२३-२४ स्पर्धेत महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायत देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार विजेती ठरली आहे. केंद्र शासनाच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने या स्पर्धेचा निकाल जाहीर केला. रोहिणी ग्रामपंचायतीस ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि १० लाखांचा रोख पुरस्कार मिळणार आहे. आंध्र प्रदेशातील नोव्होटेल, विशाखापट्टणम येथे ९ जून २०२५ रोजी होणाऱ्या २८ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२४-२५ "ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सेवा वितरणाचा विस्तार व सखोलता" या गटात देशातील निवडक ग्रामपंचायतींना गौरविण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीने सुवर्ण पुरस्कार मिळवून महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे.
#DigitalVillage #eGovernance



Post a Comment
0 Comments