Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

वीज पडून मृत्यू झालेल्या आदिवासी कुटुंबियांना आर्थिक सहाय्य करा- बिरसा फायटर्सची तहसीलदारांकडे मागणी वीज पडून दोघांचा मृत्यू, वडगांव व संचेती नगर अशा दोन ठिकाणी घटना

 वीज पडून मृत्यू झालेल्या आदिवासी कुटुंबियांना आर्थिक सहाय्य करा- बिरसा फायटर्सची तहसीलदारांकडे मागणी


वीज पडून दोघांचा मृत्यू, वडगांव व संचेती नगर अशा दोन ठिकाणी घटना

शहादा तालुक्यातील वडगांव येथे १९ मे २०२५ रोजी  वीज पडून आदिवासी युवक सुखदेव दशरथ चव्हाण  वय-३५ मुळ गाव तलावडी याचा दुर्दैवी मृत्यू झाला व संचेती नगर येथील राखणदार करणा-या कुटुंबातील तुषार पारध्या पावरा वय ११ मुळ गाव बिलगांव या बालकाचा १६ मे २०२५ रोजी मृत्यू झाला. तालुक्यात वडगांव व संचेती नगर अशा दोन ठिकाणी वीज पडून मृत्यू झालेल्या आदिवासी कुटुंबियांना आर्थिक सहाय्य मिळावे,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा जि.नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,सुरेश पवार, दिलिप मुसळदे,रामदास मुसळदे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

                          शहादा तालुक्यातील वडगांव येथे  दिनांक १९ मे २०२५ रोजी सुखदेव दशरथ चव्हाण वय ३५ यांच्यावर वीज पडून त्याचा दूर्दैवी मृत्यू झाला आहे व ५ वर्षाचा त्याचा बालक गंभीर जखमी आहे.वडगांव तितरी फाट्याजवळील चिंचेच्या झाडाखाली हवेने पडत असलेले चिंच वेचताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.पिडीत कुटुंबासोबत आमची बिरसा फायटर्स संघटना आहे. पिडीत कुटुंब हे शहादा तालुक्यातील तलावडी या गांवातील आहे. कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत हलाखीचे व गरिबीचे आहे,त्यामुळे ते  वडगांव येथे शेती काम करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात.मयत पश्चात त्यांची पत्नी व ३ मुले असा परिवार आहे.

                       शहादा येथील संचेती नगर येथील राखणदार करणा-या कुटुंबातील तुषार पारध्या पावरा वय ११ या बालकावर दिनांक १६ मे २०२५ रोजी वीज पडून त्याचा दूर्दैवी मृत्यू झाला आहे.पिडीत कुटुंबासोबत आमची बिरसा फायटर्स संघटना आहे. पिडीत कुटुंब हे धडगांव तालुक्यातील बिलगांव या गांवातील आहे. कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत हलाखीचे व गरिबीचे आहे,त्यामुळे ते राखणदारीचे काम करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात.म्हणून दोन्ही घटनेचा पंचनामा करून पुढील कार्यवाही करून पिडीत आदिवासी कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत प्रशासनाकडून देण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments