तळोद्यात महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी
तळोदा शहरात हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या 485 व्या जयंती निमित्ताने प्रतिकृती अभिषेक आणि प्रतिमा पूजन पुष्प अर्पण सोहळा समस्त हिंदू समाजाच्या सानिध्यात साजरा करण्यात आला.
तळोदा येथील हर्षवर्धन टायर या प्रतिष्ठान येथे कार्यक्रम आयोजन केले. प्रसंगी वैदिक पद्धतीने पंडित लक्ष्मीकांत पाठक यांच्याकडून मंत्रपुष्पांजली आणि दुग्धअभिषेक करून पूजन करण्यात आले. कार्यक्रमात समस्त हिंदू समाजातील हिंदू संघटना,विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुराष्ट्र सेनेच्या प्रांत आणि प्रखंड पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांनी पूजन केले.
कार्यक्रमात घोषणांच्या निनाद करण्यात आला. राष्ट्रपुरुष महाराणा प्रतापसिंहजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदू राष्ट्र उभारणीच्या शौर्य,साहस, पराक्रमांच्या गाथा मान्यवरांच्या मुखकमलातून व्यक्त करण्यात आल्या. क्षत्रिय राजपूत समाज व समस्त हिंदू समाजातील पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम सुखरूप पार पाडण्यास मोलाचे परिश्रम घेतले


Post a Comment
0 Comments