Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अक्राणी तालुक्यातील केलापाणी गावातील समस्यांवर तातडीची बैठक – जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक निर्णय!

 अक्राणी तालुक्यातील केलापाणी गावातील समस्यांवर तातडीची बैठक – जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक निर्णय!


अक्राणी तालुक्यातील केलापाणी गावातील समस्यांवर तातडीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक निर्णय घेण्यात आले.


 केलापाणी गावातील आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते व इतर मूलभूत सुविधा संदर्भात सर्व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.

 बैठकीस  उपवनसंरक्षक, नंदुरबार वन विभाग, वनक्षेत्रपाल, तोरणमाळ  उपअभियंता – ग्रामीण पाणीपुरवठा व बांधकाम विभाग, पंचायत समिती अक्राणी, आरोग्य तालुका अधिकारी, अक्राणी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, तोरणमाळ व अक्राणी, तहसीलदार, शहादा सरपंच व ग्रामस्थ, उपस्थित होते.


या बैठकीत केलापाणी येथे आरोग्य उपकेंद्रासाठी जागेच्या मंजुरीसंदर्भातील त्रुटी तात्काळ दूर कराव्यात, रस्ता तयार करण्यासाठी प्रस्ताव तत्काळ मंजूर करावा, बोअरवेलसाठी आवश्यक कार्यवाही तात्काळ सुरू करावी, जिल्हा प्रशासन गावागावात लोकांच्या गरजा समजून घेत त्यांच्या अंमलबजावणीत तत्पर आहे.

.

.

.

#MonsoonPreparedness #NandurbarCares #RoadSafety #DistrictAdministration #FloodReady #MSRDC #गोमाईपूलसुरक्षा #नंदुरबारविकास

Post a Comment

0 Comments