Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

खांबला ते अक्राणीमहल रस्ता खडीकरण व डांबरीकरण करा व ६ तुटलेले पूल बनवा- बिरसा फायटर्सची मागणी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना निवेदन

 खांबला ते अक्राणीमहल रस्ता खडीकरण व डांबरीकरण करा व ६ तुटलेले पूल बनवा- बिरसा फायटर्सची मागणी


कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना निवेदन

खंबला ते अक्राणीमहल ५ किलोमीटरचा मुख्य रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा व रस्त्यावरील ६ तुटलेले पुल तात्काळ बनवा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,सुरेश पवार, रामदास मुसळदे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. 


                          सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत येणारा खांबला ते अक्राणीमहल हा ५ किलोमिटरचा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे.खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी रस्त्याची दुरावस्था झाली आहे.रस्ता पूर्ण पणे उखडला आहे.रस्त्यावरील ६ पूल पूर्ण पणे तुटलेले आहेत. या रस्त्यावरून येणा-या जाणा-या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.या रस्त्यावर अनेक अपघात होत असून प्रवाशांना गंभीर दुखापत होत आहे. या रस्त्याची बांधकाम विभाग दुरूस्ती करते किंवा नाही,ही शंका आहे.कागदोपत्रीच दुरूस्ती दाखवून मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे प्रथमदर्शनीच दिसून येते.कारण रस्ता असून नसल्यासारखा झाला आहे.तरी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत येणारा खांबला ते अक्राणीमहल  ५ किलोमीटरचा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावा व ६ तुटलेले पूल पुन्हा नव्याने तात्काळ बनविण्यात यावेत. हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून बांधकाम विभागास देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments