तळोदा प्रकल्पात दहावीच्या परीक्षेत तलावडी आश्रमशाळेची ममता पाडवी मुलींमध्ये प्रथम तर मुलांमध्ये मोहन वळवी पाचवा
तळोदा - नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेतील निकालात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत येणाऱ्या सर्व अनुदानित व शासकीय आश्रमशाळांमधून अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा तलावडीची विद्यार्थीनीं ममता कृष्णा पाडवी ८८.८०% गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम तर ८६.४०% गुण मिळवून मुलांमध्ये मोहन गुलाबसिंग वळवी मुलांमध्ये पाचवा क्रमांक पटकाविला आहे.
आश्रमशाळेचा दहावीचा निकाल ९८.५० % लागला आहे. दहावीच्या परीक्षेतील यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास दादा नटावदकर, एकलव्य विद्यालयाच्या प्राचार्या सौ. सुहासिनी नटावदकर, तलावडी आश्रमशाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक प्रकाश साळुंखे सर तसेच प्राथमिक मुख्याध्यापक संजीवन पवार सरांनी अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments