Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

घरकुल योजनेची फॉर्म भरण्याची मुदत वाढवा- बिरसा आर्मी.

 घरकुल योजनेची फॉर्म भरण्याची मुदत वाढवा- बिरसा आर्मी.

तळोदा:घरकुल योजनेची मुदत १५ में २०२५ रोजी संपत आहे.यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी बिरसा आर्मीने गटविकास अधिकारी तळोदा व मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार यांच्याकडे केली आहे.सदर निवेदनातं म्हटले आहे की,जिल्ह्यात अजून हजारो पात्र घरकुल लाभार्थी आहेत.त्यांचे घरकुल योजना ऑनलाईन फॉर्म भरणे सुरु आहेत.परंतु,घराची नोंद करून घरचा नमुना नं.८ काढणे,नवीन जॉब कार्ड काढणे,सलग सुट्या,ऑनलाईन फॉर्म भरतांना नेटवर्क व इतर अडचणी,जनजागृती अभावी अनेक पात्र लाभार्थ्यांना अजून माहिती नाही,प्रचार-प्रसार होणे आवश्यक, दुर्गम भाग आदी.कारणांनी हजारों पात्र लाभार्थ्यांचे कागदपत्राअभावी ऑनलाईन फॉर्म भरले गेले नाही.त्यामुळे हजारो लाभार्थी वंचित राहणार असल्याने १५ में २०२५ पर्यत दिलेले मुदत वाढविण्याची मागणी बिरसा आर्मीने केली आहे. निवेदनावर बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी,जिल्हा सचिव सतीश पाडवी,मोदलपाडा शाखाध्यक्ष रोहिदास वळवी,तारसिंग पाडवी,सुनील वसावे धनराज पाडवी,महेश पाडवी आदी. कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments