विविध मागण्यांसाठी बिरसा आर्मीचा तळोदा तहसील कार्यालयावर मोर्चा
तळोदा : बिरसा आर्मीचा वतीने तहसीलदार कार्यालय तळोदा येथे विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला.तहसीलदार दिपक धिवरे मार्फत मुख्यमंत्री,आदिवासी विकासमंत्री,आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवले.
तळोदा येथील बिरसा मुंडा चौक ते तहसीलदार कार्यालय येथे काढलेल्या मोर्चात आदिवासींच्या सर्व विभागातील रिक्त पदाची विशेष पदभरती त्वरित भरणे, खाजगी एजन्सीमार्फत कंत्राटी पदभरती न राबवता; प्रशासनामार्फत कायम पदभरती राबवणे, प्रलंबित वनदावे निकाली काढून, मंजूर वनपट्टा धारकांना ७/१२ उतारा मिळावा, जिल्ह्यातील जलमिशन योजनेची कामे त्वरित पूर्ण करावीत व निकृष्ट कामे,भ्रष्ट ठेकेदार,अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करावी,सरकारने दिलेले शेतकरी कर्जमाफी आश्वासन पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, मंजूर शबरी घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान त्वरित अदा करावे, गेल्या सात वर्षापासून जिल्ह्यातील शेकडो गावातील रखडलेली पोलीस पाटील पदभरती त्वरित राबवावी,वसतिगृह /आश्रम शाळेतील डिबीटी योजना बंद करून,पूर्वीप्रमाणे सरकारी भोजन व्यवस्था स्थानिक ठिकाणीच सुरु करावी,शेतकऱ्यांना युरिया खतासोबत इच्छा नसतांना जबरदस्तीने न्यानो युरिया हे महागाचे खत घेतल्याशिवाय युरिया देत नाही.ते तात्काळ बंद करावे,शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक तात्काळ बंद करावी,सरकाने सर्व पिकांना हमीभाव जाहीर करावी,जिल्ह्यातील शिक्षण,आरोग्य,रस्ते,पाणी व विविध कल्याणकारी योजना,कामे पारदर्शकपणे राबवणे अशा विविध मागण्यांचे निवेदन दिले.निवेदनावर बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी,जिल्हाध्यक्ष भरत,जिल्हा सचिव सतीश पाडवी, तालुकाध्यक्ष देवीसिंग वळवी,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,धडगाव तालुकाध्यक्ष अजय वळवी,नवापूर तालिकाध्यक्ष राकेश वळवी,जिल्हा निरीक्षक सुभाष पाडवी,सहसचिव सुरेश मोरे,सहसंघटक कालूसिंग पावरा अक्कलकुवा संपर्कप्रमुख दिनेश वसावे,तळोदा प्रवक्ता रमाकांत वळवी,अशोक पाडवी,रोहिदास वळवी,सायसिंग पाडवी,केशव पाडवी,रोहिदास पाडवी,दिनेश वळवी,जितेंद्र वळवी व मोठया संख्येने पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.


Post a Comment
0 Comments