तळोद्यात महात्मा दिवस निमित्ताने अभिवादन कार्यक्रम

तळोदा :- महात्मा दिवस निमित्ताने माळी समाज मंगल कार्यालय येथे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले संत सावता माळी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ देविदास शेंडे यांनी महात्मा फुले यांच्या कार्यविषयी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी एन के पिंपरे, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक सुरेश सूर्यवंशी, सुरेश चव्हाण, शरद सूर्यवंशी, सुधाकर पिंपरे, राकेश मगरे, भरत सूर्यवंशी, अमोल सूर्यवंशी, सुभाष माळी, कलाताई माळी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments