Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते ध्वजारोहण

 जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते ध्वजारोहण

नंदुरबार, दिनांक 01 मे,  

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते 66 व्या स्थापना दिनानिमीत्त व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, महेश चौधरी,  जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी दिपक चव्हाण, विभागीय वन अधिकारी मकरंद गुजर, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी जितेंद्र कुवर, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क स्नेहा सराफ, नगरपालिका प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.  यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. सेठी यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना 66 व्या स्थापना दिनानिमीत्त व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments