Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नातवाच्या लग्नात भेटवस्तू नको – थेट सैनिकांसाठी मदत!समाजपरिवर्तनाचा संदेश देत भिका पाटील यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस ₹31,111 रू रक्कम स्वखुशीने प्रदान

 नातवाच्या लग्नात भेटवस्तू नको – थेट सैनिकांसाठी मदत!समाजपरिवर्तनाचा संदेश देत भिका पाटील यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस ₹31,111 रू रक्कम स्वखुशीने प्रदान

 


दि. 20 मे 2025 रोजी आपल्या नातवाच्या विवाहाच्या ग्रहशांती (भाटा) कार्यक्रमात, समाजपरिवर्तनाचा संदेश देत भिका पाटील यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस ₹31,111/- इतकी रक्कम स्वखुशीने प्रदान केली. लग्न समारंभात विविध भेटवस्तूंऐवजी राष्ट्रसेवेतील जवानांसाठी निधी देण्याचा त्यांचा हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरला.


सैनिक देशाच्या सीमांवर अखंड झगडत असतात. त्यांच्या या योगदानाची जाणीव ठेवून, समाजातील प्रत्येकाने आपल्या परीने त्यांच्या कार्यात सहभागी व्हावे, या भावनेतून पाटील कुटुंबाने ही पुढाकार घेतला. या राष्ट्रप्रेमाच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर डॉ. निलेश पाटील यांनी भिका पाटील यांचा सत्कार केला आणि अधिकृत पावती प्रदान केली. त्यांनी नवदाम्पत्यालाही शुभेच्छा दिल्या.


“प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस मदत करावी. पाटील कुटुंबाचा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी असून, देशप्रेमाचा खरा अर्थ कृतीतून दिसतो.”

– निवृत्त मे. डॉ. निलेश पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी


भिका पाटील यांचा हा निर्णय नव्या पिढीला देशभक्तीच्या सकारात्मक वळणावर नेणारा ठरतो. त्यांनी दिलेली ही देणगी रक्कम नुसती आर्थिक मदत नाही, तर ती एक सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे.


आपणही सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस मदत करू शकता.

अधिक माहितीसाठी संपर्क: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदुरबार

.

.

.

#FlagDayDonation #DeshbhaktiInAction #NandurbarPride

#SainikKalyan #InspirationalStory #CollectorOfficeNandurbar

Post a Comment

0 Comments