अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त तळोद्यात भव्य रांगोळी स्पर्धा
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी तळोदा शहर यांच्या वतीने भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अहिल्यादेवींच्या कार्यावर आधारित विविध रंगछटांनी सजलेल्या रांगोळ्यांनी रसिकांची मने जिंकली.
लहान गटात उत्तेजनार्थ पूर्व बारी पार्थ राजकुळे आरुष मगरे नायरा सूर्यवंशी यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले
लहान गटात प्रथम सुजाल मगरे द्वितीय प्राची पाटील तृतीय सानवी सोनार
मोठ्या गटात : भाविका माळी, सौ सुकन्या , वैष्णवी चौधरी, प्रणव गवळी, अक्षता बारी, यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
मोठ्या गटात प्रथम विजेता व नेहा सोनार द्वितीय निर्देश अग्रवाल व अपूर्वा राजपूत तृतीय देवयानी राजकुळे.
या कार्यक्रमावेळी शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, प्रदेश सदस्य शशिकांत वाणी, शहराध्यक्ष गौरव वाणी, विधानसभा प्रभारी कैलास चौधरी, तसेच शाम राजपूत, शिरीष माळी, सुभाष चौधरी, प्रदीप शेंडे, अनिल परदेशी, ऋषिकेश बारगळ ,अतुल जैस्वाल, दिनेश खंडेलवाल, सुभाष जैन यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष शानुताई वळवी, निलाबेन मेहता, रसिलाबेन मेहता ,अनिता कलाल , सारिका चौधरी,यांचीही विशेष उपस्थिती होती. परीक्षक नरेंद्र गुरव आणि सूत्रसंचालन प्रकाश वानखेडे यांनी केले. स्पर्धेमुळे तरुण कलाकारांना आपली कला सादर करण्याची प्रेरणा मिळाली असून, उपस्थित सर्वांनी अहिल्यादेवींच्या कार्याला अभिवादन केले.
---





Post a Comment
0 Comments