Type Here to Get Search Results !

जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज सादर करावे सुनंदा पाटील

 जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज सादर करावे

सुनंदा पाटील

              नंदुरबार, दिनांक 09 एप्रिल, 2025 (जिमाका) :

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू व मार्गदर्शकांच्या कार्याचे आणि योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी देण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्कार 2022-23, 2023-24 व 2024-25 या तीन वर्षासाठी अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


2022-23, 2023-24 व 2024-25 या तीन वर्षासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार पुरुष व महिला गटातील गुणवंत खेळाडू पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी अर्ज आवश्यक त्या छायाकिंत कादपत्रांसह सादर करावाचे आहे.   प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह व रोख 10 हजार रुपये पुरस्काराचे स्वरुप आहे.


ज्या खेळाडूंनी यापूर्वी जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त केला आहे, ते राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत. एकदा एका खेळामध्ये किंवा एका प्रवर्गामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती पुन्हा त्याच खेळात किंवा प्रवर्गात पुरस्कार मिळण्यास पात्र राहणार नाही. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्य असल्याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, साक्री नाका, खामगाव रोड, नंदुरबार येथे 8 ते 21 एप्रिल, 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत पीडीएफ स्वरुपात उपलब्ध होतील. विहित नमुन्यात भरलेला अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांची छायांकित कागदपत्रे, 2 पासपोर्ट साईज फोटो, इत्यादि सर्व कागदपत्रे पुस्तिकीच्या स्वरुपात एकत्रित करुन बंद लिफाफ्यात जिल्हा क्रीडा कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे.


अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी ओमकार जाधव मोबाईल 8208450288 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



Tags

Post a Comment

0 Comments