Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ब्राम्हणपुरी येथे "शासन आपल्या दारी" उपक्रमांतर्गत श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीर

 ब्राम्हणपुरी येथे "शासन आपल्या दारी" उपक्रमांतर्गत श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीर 

 शहादा  तालुक्यातील मंडळ भाग ब्राम्हणपुरी अंतर्गत ब्राम्हणपुरी  येथील जि.प. शाळेत श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य व ग्रामपंचायत विभाग यांच्या समन्वयातून विविध दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

या अभियानात शालेय दाखले,  रेशन कार्ड, ॲग्री स्टॅक प्रमाणपत्र, वारसांचे सातबारे, विधवा, दिव्यांग व वृद्धांसाठी प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, जातीचे व उत्पन्नाचे दाखले, जन्म दाखले व जॉब कार्ड,

या उपक्रमात  माधवराव पाटील,  भगवान शंकर पाटील, मंडळ अधिकारी  मधुकर सुर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील व नागरिक उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  लक्ष्मण कोळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती सुरेखा राठोड (ग्राम महसूल अधिकारी, ब्राम्हणपुरी) यांनी केले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक व संबंधित विभागांचे अधिकारी/कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.


#शासनआपल्या-दारी # श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वअभियान #महाराष्ट्रशासन #महसूलविभाग  #जिल्हाधिकारीनंदुरबार

#शहादा तहसील #ब्राम्हणपुरी 

#जनतेसाठीशासन #प्रमाणपत्रवाटप

Post a Comment

0 Comments