Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पहलगाम हल्ल्याचा अक्कलकुवा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध तहसीलदार यांना निवेदन

 पहलगाम हल्ल्याचा अक्कलकुवा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध तहसीलदार यांना निवेदन 



अक्कलकुवा :-

जम्मु काश्मिर राज्यातील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष करुन त्यांची निघृणपणे हत्या केली याचा अक्कलकुवा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 

       तहसीलदार विनायक घुमरे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जम्मु काश्मीर राज्यातील पहलगाम येथे दुपारच्या वेळेला घोडेस्वारी करत असलेल्या पंजाबी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अमानुषपणे गोळीबार करुन 26 पर्यटकांची निघृणपणे हत्या केली. विशेष म्हणजे या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारुन हत्या केली. या दहशतवादाला खतपाणी देऊन त्यांना आश्रय देणाऱ्या देशाची चौकशी करुन त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई करुन दहशतवाद्यांचा खात्मा करावा अशी मागणी केली. या घटनेचा शिवसेनेच्या वतीने अक्कलकुवा अक्राणी विधानसभेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वात तहसीलदार विनायक घुमरे यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला. यावेळी आमदार आमश्या पाडवी, ललित जाट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी तहसीलदार यांच्या दालनात पहलगाम घटनेत मृत पावलेल्या पर्यटकांना एक मिनिट स्तब्ध राहुन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा सह संपर्क प्रमुख लक्ष्मण वाडीले, नंदुरबार जिल्हा संघटक जगदीश चित्रकथी, युवा सेना लोकसभा प्रमुख ललित जाट, तालुका प्रमुख तुकाराम वळवी, तालुका संघटक आनंद वसावे, शहर प्रमुख रावेंद्रसिंह चंदेल,  युवा सेना जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, खापर शहर प्रमुख रवी पाडवी, आमदार आमश्या पाडवी यांचे स्विय सहाय्यक सुधीरकुमार ब्राम्हणे, डिंपल चौधरी, किरण चौधरी, सरपंच दिनेश वसावे, सोशल मिडिया जिल्हा प्रमुख, हुजेफा बलोच,  चालक गणेश वळवी आदीं उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments