जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेला वेग!शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
शासनाची महत्वाकांक्षी योजना तून गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार आता जिल्ह्यात जलद गतीने राबवली जात आहे! ही योजना शेतीसाठी सुपीक माती, धरणातील पाणीसाठा वाढवणे या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे.
लोंढरे (ता. शहादा) येथे जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेठी यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला. तर निलेश पाटील (ल.पा. सिंचन विभाग) शैलेंद्र गवते, नायब तहसीलदार, तहसील कार्यालय शहादा गुणवंत पाटील, श्री. गोपाल पाटील (पाणी फाउंडेशन) सौ. स्वाती पाटील (टाटा मोटर्स) जितेंद्र पाटील (नाम फाउंडेशन) ग्रामपंचायत प्रतिनिधी, सरपंच, शेतकरी आणि लाभार्थी
ही योजना महाराष्ट्र शासन, नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे. योजनेचे फायदे:
तलावातील गाळ काढून जलसाठा वाढतो गाळामुळे जमीन सुपीक होते. कृषी उत्पादनात वाढ शेतकऱ्यांनो, ही सुवर्णसंधी गमावू नका!
आपली शेती सुपीक करा, जलसंधारणाला हातभार लावा!
- जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेठी यांचे आवाहन
#गाळमुक्तधरण #गाळयुक्तशिवार #जलसंधारण #शेतीवाढ #नंदुरबार #शहादा #Maharashtra




Post a Comment
0 Comments