तळोद्यात करिअर कंपास मार्गदर्शन शिबिर संपन्न मान्यवरांचे मार्गदर्शन...
तळोदा येथील सेवाभावी सामाजिक संस्था भारतीय जैन संघटना व सहयोग सोशल ग्रुप यांचे संयुक्त विद्यमाने प्राचार्य गो.हु.महाजन न्यू हायस्कूल येथे दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवशीय करियर कंपास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे यशस्वी भवितव्य घडविण्याचे दृष्टीने मोलाचे मार्गदर्शन घेऊन या महत्त्वाच्या टप्प्यावर पुढे जाणे हे आयुष्याला मोलाची दिशा देऊ शकते या दृष्टीने हे शिबिर म्हणजे करिअरसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरावे या दृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य गोहू महाजन न्यू हायस्कूलचे प्राचार्य अमरदीप महाजन हे होते तर प्रमुख मार्गदर्शन म्हणून प्राध्यापक डॉक्टर सुनील गोसावी भारतीय जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष एडवोकेट अल्पेश जैन प्राध्यापक राजाराम राणे प्राध्यापक पुजा जैन, पंडित भामरे उपमुख्यद्यापक एस.एस.सी खैरनार, सुनील सूर्यवंशी पर्यवेक्षक ए .एल महाजन ए. आर सूर्यवंशी, पराग राणे आधी उपस्थित होते दीप प्रज्वलानाने कार्यक्रमाच्या शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राध्यापक पूजा जैन यांनी केले प्रास्तविकातून त्यांनी दहावी बारावीनंतर आजच्या काळात आपले करिअर घडावे यासाठी अचुक निवड करणे कसे महत्त्वाचे आहे हे सांगितले प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर गोसावी यांनी दहावी बारावी नंतर करिअरच्या संधी कोणत्या क्षेत्रात जास्त आहेत त्यांची योग्य निवड कशी करावी याबद्दल अचूक मार्गदर्शन केले
प्राचार्य अमरदीप महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून करिअर संबंधी असलेल्या विविध संधीच्या कसा उपयोग करून घ्यावा याची माहिती त्यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून सुनील सूर्यवंशी यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट अल्पेश जैन सहयोग सोशल ग्रुप भारतीय जैन संघटना यांचे इतर पदाधिकारी सदस्य न्यू हायस्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment
0 Comments