Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शिवजीला शरण गेलेला व्यक्ती कधी डुबत नाही. या संसार रूपी सागरात पोहून जातो - पंडित प्रदीप मिश्रा सिहोरवाले दहा लाखापेक्षा जास्त भाविक कथेत उपस्थिती

 शिवजीला शरण गेलेला व्यक्ती कधी डुबत नाही. या संसार रूपी सागरात पोहून जातो  - पंडित प्रदीप मिश्रा सिहोरवाले 

दहा लाखापेक्षा जास्त भाविक कथेत उपस्थिती 


शहादा:-  शिवजी म्हणजे विश्वास - विश्वासाचे प्रतीक. जो कोणी शिवजी वर विश्वास करतो त्याच्या नेहमी विजय होतो. शिव शरण गेलेला व्यक्ती कधी डुबत नाही. या संसार रूपी सागरात पोहून जातो.जो व्यक्ती शिवजी वर रोज एक लोटा जल चढवतो - ओम नमः शिवाय - नमःशिवाय या पंचाक्षरी षडाक्षरी तसेच श्री शिवाय नमस्तुभं मंत्राच्या जप करतो - जो मंडपात येऊन शिव महापुराण कथेचे श्रवण करतो - त्याने शिवची शरणागती पत्करली आहे आणि शिव शरण गेलेला व्यक्ती नेहमी विजयी होतो. शिवजी त्याला पराभव होऊ देत नाही. आपण बघतो लाकूड कधीच पाण्यात डुबत नाही तो पाण्यावर नेहमीच तरंगतो कारण वृक्षाने आकाश - पाणी आणि वायू पैकी पाण्याची शरणागती पत्करलेली आहे. म्हणून पाणी त्याला डुबू देत नाही. म्हणून काही दुःख येवो - संकट येवो आपण शिवला शरण गेले पाहिजे. असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांनी केले.

शहादा येथे शिव महापुराण कथेच्या चौथा दिवस, आजच्या कथेच्या श्रीगणेश करताना पंडित प्रदीप मिश्रा म्हणाले की,

*पकडलो हात त्रिपुरारी 

नही तो डूब जायेंगे 

हमारा कुछ न जायेंगा 

तुम्हारी शान जायेगी 

पकडलो हात त्रिपुरारी

पंडितजी म्हणाले की पुण्य करण्यासाठी  विचार करावा लागतो - पाप कळत नकळत होऊन जातात.माणसाचे कर्म माणसाचा माग सोडत नाही.या जन्माचे पाप पुण्य पुढच्या जन्मात फेडावेच लागतात.यासाठी पंडितजी श्रीमद् भागवत ग्रंथ मधील एक सुंदर उदारण देतात. श्रीमद्भागवत ग्रंथ ७३९००००० शब्दांनी बनला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मानंतर श्रीकृष्णाच्या वध करण्यासाठी कंस पुतना- करणावत - ताडका - तृणावर्त या क्रर राक्षसाना पाठवतो.  बाल श्रीकृष्ण यांचे वध करतात. पंडितजी म्हणतात ज्या श्रीकृष्णाने बाल अवस्थेत या मोठ मोठ्या रक्षणाच्या वध केला त्याने कंसाच्या वध करून देवकी मातेची कंसापासून सुटका करण्यासाठी १४ वर्ष का लावले? जेव्हा स्वयं देवकी माता श्रीकृष्णाला हा प्रश्न विचारते.तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात मागच्या जन्मी मी राम होतो आणि आपण माता कैकयी आणि तुझ्यामुळे मला चौदा वर्ष वनवासाच्या त्रास भोगाव लागला म्हणून मी तुला कंसाच्या त्रासापासून १४ वर्षांनी सोडवले.यशोदा माता ज्याच्या अंगणात मी लहानाच्या मोठ्या झालो . माझ्या बालपणाच्या आनंद - मातृत्वाचा आनंद या यशोदा मातेने उपभोगला ती मागच्या जन्मी माझ्या विरहात १४ वर्ष रडणारी कौशल्या माता होती.कर्माचे भोग चुकत नाही. 


*मत बुरे कर्म कर बन्दे, वरना पछताएगा। 

भगवान की नजर से, ना बच पाएगा। 

अरे ओ प्राणी, मत कर नादानी ।

पंडितजी पुढे म्हणतात की अमरनाथ गुहेत भगवान शिव शंकर पार्वती मातेस म्हणतात कलियुगात जन्मास येणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या डोक्यावर पापाची गढरी घेऊनच जन्मास येतो. कळत नकळत त्याच्या हातातून पाप होत असतात आणि ह्या पापा पासून मुक्ती मिळवण्याच्या एकमेव मार्ग म्हणजे शिवभक्ती आहे. " एक लोटा जल सब समस्याओं का हल ".

कर्म करो पर ध्यान रहे पथ छुटेना

तनी भरो हवा गुब्बारा फुटेना

पुढे पंडितजी म्हणाले तारकासुर राक्षस शिवभक्त होता.भगवान शिवजी कडून तारकासुर वर मागतो माझ्या मृत्यू शिवपुत्रा कडुन झाला पाहिजे. भगवान कार्तिकेय राक्षस तारकासुरच्या वध करतात. परंतु शिवभक्ताच्या वध केल्याचा पाप त्यांना लागतो. या पापा पासुन सुटका करण्यासाठी तीन पाच फुटी शिवलिंग त्यांना स्थापित करावे लागतात.सनद कसाईला त्याच्या पुर्व जन्माचा पुण्यामुळे शालिग्राम रूपाने भगवान विष्णू दर्शन देतात .श्री गणेश आणि रिद्धी सिद्धीच्या विवाहाने आजच्या चौथ्या दिवसाच्या कथेला विराम दिला गेला .

कथेला चौथ्या दिवशी पूज्य प्रतापदादा वसावे रतनबारी अक्कलकुवा, पूज्य जितूदादा पाडवी महाराज मोरवड, दत्तानंदजी महाराज शिंदखेडा जिल्हा धुळे, अजबसिंग महाराज, ब्राह्मणगाव, खापर, नंदुरबार, प्रकाश पुरीजी महाराज, नंदुरबार, परमपूज्य जिज्ञासाजी दीदी, कोठली, पानसेमल मध्यप्रदेश येथील आमदार श्याम बर्डे, धुळे येथील महापौर प्रतिभा चौधरी, यांच्यासह सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राज्यातील दहा लाखापेक्षा जास्त भाविक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments