Type Here to Get Search Results !

स्वामी पुण्यतिथी निमित्त तळोदा येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात अखंड नाम जप,यज्ञ,याग सप्ताहाचे आयोजन

 स्वामी पुण्यतिथी निमित्त तळोदा येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात अखंड नाम जप,यज्ञ,याग सप्ताहाचे आयोजन

                                           तळोदा शहरातील श्री स्वामी समर्थ (दिंडोरी प्रणित) सेवा केंद्रात दि.20 एप्रिल पासून ते 26 एप्रिल पर्यंत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम, जप, यज्ञ,सप्ताहाचे आयोजन  करण्यात आले आहे.

       भगवान श्री स्वामी समर्थांची नाममात्र जीर्ण देह सोडण्याची तिथी व त्या दिवसाची आठवण म्हणून 7 दिवसांचा सप्ताह सर्व दिंडोरी प्रणीत " श्री स्वामी समर्थ" सेवा केंद्रावर विशिष्ठ पद्धतीने यज्ञ, याग, होम हवन, जप, तप, ध्यानधारणा इ. उपासना व प्रात्यक्षिके केली जात असतात. तसेच या सप्ताहात प्रहर सेवा 7 दिवस 24 तास अखंड सेवा सुरु असते. त्यात विना वादन, श्री स्वामी समर्थ मंत्र जप, श्री स्वामी चरित्र सरामृत, वाचन होणार आहे. या वरील सेवेमुळे आपल्या जीवनातील दुःख, संकटे, दूर होते, या सेवेत दिवसातून एक तास आपण दिल्याने आपले आजारपण, पिडा, दूर होऊन आयुष्य वृद्धिंगत होते, आर्थिक प्रगती होते. व सतत 7 दिवस चालणाऱ्या या सेवेचे फळ लाभते अशी भाविकांची अतूट श्रद्धा आहे. 

      हिंदू धर्मातील पाचवा वेद, मानवी जीवनातील दुःख, संकटे, पिडा, शाप, ताप, दोष यावर रामबाण उपाय म्हणजे गुरुचरित्र वाचनाने चमत्कारीक अनुभवाची जाणीव होते, मानवी जीवनातील इच्छा, प्रश्न सोडवीण्यासाठी एक संजीवनी म्हणजे गुरुचरित्र अशा या शक्तिशाली मंत्राने भरलेल्या ग्रंथाचे वाचनासाठी आपले नाव तळोदा केंद्रामध्ये नोंदवावे तसेच या सप्ताहात प्राधानिक स्वरूपात भागवत पारायण, हवनयुक्त गुरुचरित्र पारायण, श्री दुर्गा सप्तशती पाठ, श्री स्वामी चरित्र सारामृत, श्री नवनाथ पारायण व अनेक देव देवतांची हवनाद्वारे प्रत्यक्ष सेवा करण्यात येणार आहे की. त्यात दि.19 एप्रिल वार शनिवार रोजी सकाळी ग्रामदेवता सन्मान, मंडल माडणी दि.20 एप्रिल वार रविवार रोजी मंडल स्थापना, अग्निस्थपना, हवन दि.21 एप्रिल वार सोमवार रोजी नित्यस्वाहाकार, गणेश याग,मनोबोध याग दि.22 एप्रिल वार मंगळवार रोजी सकाळी नित्यस्वाहाकार, श्री.चंडी याग

दि.23 एप्रिल वार बुधवार रोजी नित्यस्वाहाकार, श्री.स्वामी याग

 दि.24 एप्रिल वार गुरुवार रोजी

 नित्यस्वाहाकार श्री.गीताई याग,

दि.25 एप्रिल वार शुक्रवार रोजी नित्यस्वाहाकार, श्री.रुद्र याग, मल्हारी याग व 26 एप्रिल वार शनिवार रोजी नित्यस्वाहाकार, बलीपूर्णाहुती, श्री.सत्यदत्त पूजन, यज्ञ सप्ताह स्वामी समर्थ पुण्यतिथी सांगता समारोह व नंतर  महाआरती व महाप्रसाद व सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी तळोदा येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात (दिंडोरी प्रणित) सेवेचा लाभ घ्यावा व आपल्या जीवनाचे सार्थक करून घावे असे आव्हाहन तळोदा येथील श्री स्वामी समर्थ केंद्रामार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments