सेवा हक्क दिन उत्साहात साजरा!
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे सेवा हक्क दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवारीया, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हरिष भामरे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे मार्गदर्शन :
आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान व कार्यक्षम करण्याचे आवाहन
"आपले सरकार सेवा केंद्र" संकल्पनेत विस्तार करून सर्व सेवा एकाच ठिकाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय
धडगाव व अक्कलकुवा तालुक्यांमध्ये विशेष सेवा हमी प्रकल्प राबविण्याची घोषणा
पोलीस विभागासोबत "एक खिडकी योजना" कार्यान्वित करून विविध शासकीय योजना व सेवांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध करण्याची योजना
सेवा हमी कायद्यानुसार वेळेत सेवा न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे स्पष्ट निर्देश
उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवारीया यांचे प्रतिपादन :
सेवा हक्क कायद्यांतर्गत वेळेत सेवा देणे ही अत्यावश्यक बाब असून, नागरिकांना विशेषतः दुर्गम भागांतील नागरिकांना, वेळेवर सेवा मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ॲड. सागर घाटे (उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद) यांचे मार्गदर्शन :
सेवा हमी कायद्याच्या कायदेशीर बाबी, अधिकार व अंमलबजावणी प्रक्रियेची सविस्तर माहिती उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.
प्रशस्तीपत्र वितरण :
महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अन्वये सन 2024-25 मध्ये उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
प्रशस्तीपत्र प्राप्त अधिकारी :
सहाय्यक जिल्हाधिकारी नंदुरबार अंजली शर्मा
तहसिलदार दिपक धिवरे (तळोदा)
तहसिलदार दिपक गिरासे (शहादा)
तहसिलदार दत्तात्रय जाधव (नवापूर)
नायब तहसिलदार राजेश अमृतकर (नंदुरबार)
नायब तहसिलदार दिलीप गांगुर्डे (अक्कलकुवा)
नायब तहसिलदार किसन गावीत (अक्राणी)
शपथग्रहण :
सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवा हमी दिनानिमित्त सेवा हक्क शपथ घेतली.
---
#सेवा_हक्क_दिन #नंदुरबार #ModernGovernance #AIinGovernance #PublicService #SmartAdministration





Post a Comment
0 Comments