बिरसा फायटर्सची तळोदा तालुका व मालदा गाव शाखेची कार्यकारणी गठीत;भ्रष्टाचार व अन्यायाविरोधात लढण्याचा केला निर्धार!
तळोदा :- बिरसा फायटर्स या सामाजिक संघटनेच्या शाखा दिवसेंदिवस वाढतच आहेत. बिरसा फायटर्सच्या कार्याला प्रभावित होऊन अनेक कार्यकर्ते बिरसा फायटर्स संघटनेत काम करण्यास इच्छा व्यक्त करीत आहेत.
दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी तळोदा तालुक्यातील मालदा या गांवात बिरसा फायटर्स गांव शाखा मालदाची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली.गांव अध्यक्ष म्हणून राकेश पावरा यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्ष हेमंत ठाकरे,युवा अध्यक्ष विश्वास ठाकरे,सचिव राहुल मावची,सहसचिव विजय खर्डे,कार्याध्यक्ष हुपसिंग वळवी,कोषाध्यक्ष विशाल ठाकरे,सल्लागार वनकर ठाकरे, संघटक दिनेश मावची, प्रसिद्धीप्रमुख योगेश नाईक, महिला प्रतिनिधी अंजना खर्डे,सदस्य युवराज वळवी,विकास ठाकरे,वनकर ठाकरे, कृष्णा वळवी,राजेश वळवी असे २५ सदस्य याप्रमाणे गाव शाखेची कार्यकारणी घोषित करण्यात आली.तळोदा तालुकाध्यक्ष पदी सुभाष पावरा ,उपाध्यक्ष हाना पटले,सचिव विजय खर्डे,सहसचिव फेका पावरा,कोषाध्यक्ष गोवल्या वसावे,सल्लागार सुभाष ठाकरे,संघटक विकास ठाकरे,प्रसिद्धीप्रमुख युवराज वळवी,महिला प्रतिनिधी मंगला पवार, सदस्य संदिप खर्डे,मनिष खर्डे,विजय मावची,रमेश पवार, मंगल सावनाके,लक्ष्मण वळवी,अजित पवार, कांतीलाल रावताळे,माधव वसावे अशी कार्यकारणी पदी निवड करण्यात आली.
काही कारणास्तव जुनी तळोदा तालुका कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्यकारणी निवड करण्यात आली आहे.नवीन कार्यकारणीत अनेक नवीन चेहर्यांना संधी देण्यात आली आहे.अन्याय अत्याचारांविरोधात व भ्रष्टाचाराचाविरोधात लढण्याचा निर्धार नवीन बिरसा फायटर्स टिमने केला आहे.
यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, जिल्हाध्यक्ष हिरामण खर्डे, तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,राकेश पावरा,किसन वसावे,हाना पटले सह मालदा,बिलीचापडा,धजापाणी,अक्राणी महल येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्यांचे नियुक्तीपत्र देऊन त्यांचे हार्दिक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.






Post a Comment
0 Comments