Type Here to Get Search Results !

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जलसंधारण योजनांचा आढावा

 जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जलसंधारण योजनांचा आढावा

               नंदुरबार । दिनांक ८ एप्रिल १०२५ (जिमाका) जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध जलसंधारण योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक पार पडली.

      या बैठकीत जलयुक्त शिवार अभियान २.०, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अभियान, अमृत सरोवर योजना, लघुसिंचन योजनांची ७ वी प्रगणना व जलसाठ्याची २ री प्रगणना यांचा समावेश होता. तसेच मृदसंधारण व जलसंधारण कामांची प्रत्यक्ष स्थळी पडताळणी (Ground Truthing) याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी अंमलबजावणीत गती आणण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्यक्ष स्थळी पडताळणी करून कामांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला.

या बैठकीद्वारे जलसंवर्धनासाठी कार्यरत असलेल्या योजनांची सुसूत्र अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठीची दिशा ठरवण्यात आली.


Post a Comment

0 Comments